कब्ज / मलावष्टभ / Constipation
February 15, 2023

लहान मुले व कोरोना

सध्या सर्वत्र आपण एकच नाव ऐकतो ते म्हणजे कोरोना.त्याचे कारण ही तसेच आहे,करण त्याने संपुर्ण जगाला विळखा घातला असून त्याचे हे भयावह रूप असले तरी आपण त्याला रोखु शकतो ,योग्य मार्गदर्शन व खबरदारी घेतल्यास.

सध्या कोरोनाचे जगभर थैमान असतांना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय किंवा त्यांच्या संसर्गापासून मुलांना टाळायचे कसे,हे प्रश्न मनात उत्पन्न होणे साहजिकच आहे,पालकांना त्याविषयी चिंता असणे खबरदारी म्हणून योग्य आहे.

लहान मुलांचे वय हे कफाचे असते म्हणून मुलांना सर्दी ,खोकला असल्यास काळजीचे नाही,परंतु त्या सोबत स्वासकुच्छता म्हणजे स्वास घेण्यास त्रास होणे त्यासोबत हायग्रेड ताप असणे ही लक्षणे असल्यास मात्र काळजीचे आहे, त्यावेळेस आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन तपासुन घेणे महत्त्वाचे आहे व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे

ही जी व्हायरसेस आहेत ती उत्तम रोगप्रतिकारशक्ती नसलेल्या व्यक्तीना लवकर होतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे महत्वाचे आहे,त्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे की

स्वस्थस्य  स्वास्थ्य रक्षणम्!!

  आतुरस्य व्याधीपरिमोक्षणम्!!

 

आयुर्वेदामध्ये सर्वप्रथम वर्णन केले की तुमचे स्वास्थ उत्तम असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आजाराचे लागन लवकर होत नाही,त्यासाठी तुमची रोग प्रतिकार शक्ती क्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे योग्य रोग प्रतिकारक क्षमता आपण आयुर्वेद शास्त्रातील ऋतूंचाऱ्या, दिनचर्या, औषधे, आहार,विहार याचे पालन केल्यास निर्माण करता येऊ शकते.उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असल्यास अश्या महामारीच्या काळात त्याच्या पासून आपल्या स्वास्थाचे रक्षण होते.

 

#मुलांमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी काय करावे-

1)मुलांना सात्विक व सकस आहार देणे जसे भाजी,चपाती,वरण, भात, तूप,शिरा,फळभाज्या,

2)त्या त्या ऋतुत उत्पन्न होणारी ताजी फळे दररोजच्या खाण्यात असावी.

3)पचायला हलका असा प्रोटीन युक्त आहार असावा.

4)मुलांना जंक फुड पासुन दुर ठेवावे.

5)जेवणाच्या वेळी नियमित करणे

6)रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठण्याची सवय लावणे.

7)सकाळी उठल्यावर नियमित व्यायामाची सवय मुलांना लावणे,त्यात प्राणायाम,योगासने,रनिंग करणे,हलका व्यायाम करणे.

8)मुलांना  TV /मोबाईल पासून दूर ठेवणे,इतर मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करणे.

 

#मुलांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी-

 

1)मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.

2)आजुबाजुला कोरोनाचा रुग्ण असल्यास त्यापासून लांब ठेवणे.

3)डोळे,नाक,चेहऱ्याला हाताने स्पर्श करू नये.

4)खोकला किंवा शिंक आल्यास तोंडावर रुमाल किंवा टीशु पेपर धरावा.

5)बाहेर पडण्याची आवश्यकता असल्यास मास्क वापरावे.

6)साबण व पाण्याने हात वरचेवर स्वच्छ करावे,शक्यतो लहान मुलांसाठी अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटाझर वापरू नये.

7)मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत व   स्वच्छतेची सवय शिकवावी.

8)मुलांना जेवणाआधी व नंतर, शौचालयाचा वापर केल्यावर व बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुण्यास सांगावे.

अश्याप्रकारे योग्य पालन केल्यास आपल्याला व सर्व समाज बांधवांना यापासून वचवू शकतो.

 

पालकांना सध्या या काळात मुलांना घरात ठेवणे खूपच कठिण वा तारेवरची कसरत आहे,तरी पालकांनी या वेळेचा योग्य वापर करून मुलामध्ये योग्य सवयी व त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यात भर दयावा,ही सुवर्ण संधी पालकांना मिळाली आहे ,आपल्या कुटुंबासोबत घालवून त्याचा सदुपयोग द्यावा.

नोकरी निमित्ताने आईवडिलांना मुलासोबत , कुटुंबासोबत व एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो परंतु तशी संधी मिळत नाही .आता तुम्हाला ती संधी मिळाली आहे, त्याचा सदुपयोग घ्या, अशी संधी कधी मिळेलच असे नाही ,त्यामुळे आनंदात घरीच राहा,सुरक्षित राहा.

#घरी राहा कोरोनापासून दुर राहा#

श्री विश्वदत्त आयुर्वेद
भारतातील पहिले मुलांचे आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र,
सिंहगड रोड,धायरी फाटा,पुणे
मोबाईल:-9420002275
9420002276

Visit Us : www.childayurved.com